मुंबई : भरधाव वेगात असणारी ओला टॅक्सी हाजी अली परिसरात संरक्षक भिंत तोडून समुद्रात पडली. या भीषण अपघातामध्ये चालक आणि प्रवासी सुखरूप आहेत. मात्र गाडीचे नुकसान झाले असून चालकाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दादरमध्ये राहणार्‍या आदित्य तावडे या मुलाने त्याच्या मित्रांना फिरवण्यासाठी ओला टॅक्सी बुक केली होती. रात्रभर मुंबई फिरून सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी तीन मित्र हाजी अली परिसरात जाताना  हा अपघात झाला. 


ओला चालक अब्दुल रशिद याचा डोळा लागला आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या गाडीने संरक्षक भिंतीचा कठडा तोडला आणि ती थेट समुद्रामध्ये कोसळली. 


अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रवासी आणि चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. प्रवासी सुखरूप असून त्यांना किरकोळ जखमा झाल्या आहे. नजिकच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यांवर उपचार सुरू आहेत. 
याप्रकरणी चालक रशीद विरोधात गुन्हा नोंदवला आहे.