मुंबई : ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिवाईस बंद करुन विरोध प्रदर्शन करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ मार्चला दिल्ली, मुंबई, गुरुग्राम आणि अन्य शहरातील लोकांना अडचण होऊ शकते. कारण महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे संजय नाईक याबाबत विरोध प्रदर्शनाचं आयोजन करणार आहे. सकाळी ८ पासून चालक आपले डिवाईस बंद करुन आपलं विरोध दर्शवणार आहेत.


त्यांनी म्हटलं की, अनेक वर्षांपासून कंपन्यांच्या खराब व्यवस्थेमुळे चालकांना त्रास होत आहे. जर आमच्या मागण्या गंभीरपणे नाही घेतल्या गेल्या तर अनिश्चित काळासाठी विरोधत प्रदर्शन सुरु राहिल.


चालकांचं म्हणणं आहे की, त्यांच्यासाठी 1.25 लाखांचा बिझनेस सुनिश्चित करावा. जे सुरुवातील त्यांना सांगण्यात आलं होतं. कंपन्यांनी स्वत:च्या गाड्या देखील बंद कराव्या. कमी रेटींगच्या ड्राईव्हरची पुन्हा नियुक्ती करावी आणि वाहनानुसार भाडं निश्चित करावं अशा विविध मागण्यासाठी चालक काम बंद आंदोलन करणार आहेत.


फक्त मुबईमध्ये ४५००० कॅब आहेत. पण सध्या या व्यवसायात २० टक्के घट झाली आहे. लोनवर गाडी घेऊन काम करणाऱ्या चालकांना लोनचा हप्ता देखील भरणं कठीण झालं आहे. त्यामुळे त्यांच्या गाड्या बँकेकडून जप्त होत आहे.