Mumbai Local Train Treading Video:  प्रत्येकाला आपल्या आयुष्यात जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. प्रत्येकाचा संघर्ष हा वेगवेगळा असतो. मुंबईकर रोज लोकल ट्रेनसारखे जगण्यासाठी धावत असतात. मुंबईतील लोकल ट्रेनमधील (Mumbai Local)  जग हे मुंबईबाहेरील लोकांसाठी कुतूहलाचं असतं. इथे आपल्याला अनेक संघर्षांच्या कहाण्या मिळतात. रस्त्यावर जाताना अनेक वेळा धडधाकट पुरुष असो वा महिला आपल्याला भूक मागताना दिसतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांना पाहून अनेक वेळा वाटतं की, हे लोक मेहनत का नाही करत. पण कसं आहे ना, काही लोकांना कष्ट करणे कधी जमतच नाही, भूक मागितली तर चालेल पण मेहनत नको. पण या आयुष्याचा संघर्षात अनेक लोक असे असतात ज्यांचा जगण्याच्या संघर्षाची कहाणी पाहून ऐकून त्यांना सॅल्यूट करण्याची इच्छा होते. मुंबई लोकल ट्रेनमधील असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Old Lady selling snacks on Mumbai Local Train Treading Video)


हा व्हिडीओ (Video) पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. ज्या वयात आपल्याला आराम करायला पाहिजे त्या वयात ही वृद्ध महिला लोकलमध्ये चॉकलेट विकताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्स भावूक होत आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर यूजर्सचे मन जिंकत आहे.


व्हिडीओ शेअर करत स्वाती मालीवाल यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एखाद्याचे जीवन आराम आहे, संघर्ष हेच एखाद्याच्या जीवनाचं नाव आहे. काबाडकष्ट करून दोन वेळची भाकरी कमावणाऱ्या या महिला आणि त्यांच्यासारखे हजारो लोकांनाकडून शक्य असल्यास वस्तू खरेदी करा. आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाख 16 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 



हा व्हिडीओ खरं तरमोना एफ खान या ट्रेन प्रवाशाने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. मोना खानने लिहिले की, 'ती मागणी करत नाही, ती मेहनत करत आहे. जमेल तेवढी मदत करा.' वृद्धापकाळातही ती जगण्यासाठी कशी मेहनत घेत आहे हे पाहून अनेकांनी महिलेचं कौतुक केलं आहे.एका यूजरने कमेंट केली की, 'या वृद्ध महिलेला सलाम. बहाणा करणाऱ्या तरुणांना ती प्रेरणा देत आहे. दुसर्‍या युजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'कधी कधी कुठलाही विचार न करता आणि गरज नसतानाही गोष्टींची खरेदी करावी.'