मुंबई : Omicron variant : ओमायक्रॉनमुळे 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर (31st December party) निर्बंध येण्याची शक्यता अधिक आहे. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल, असे संकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिले आहेत. सेलिब्रेशनला परवानगी देताना विचार करावा लागेल, असे त्या म्हणाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचं संकट आहेत. अशातच पार्ट्या आणि कॉन्सर्टच्या निमित्ताने गर्दी होत आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांना परवानगी देतांना खूप विचार करावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे लोकांनी नियम पाळले नाहीत तर याचा परिणाम थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवर होऊ शकतो, असे संकेत यावेळी त्यांनी दिलेत.