राज्यात कोरोनाचा आकडा 10 हजाराकडे, मुंबईत 55 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण
Omicron Updates: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid cases) राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई : Omicron Updates: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid cases) राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 5,428 रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे. 24,509 ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद आहे. तर कोरोनाबाधितांपैकी 55 टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. हे रुग्ण मुंबईचेच रहिवासी आहेत. (Omicron found in 55 Percent samples of Covid patients in Mumbai,BMC survey)
ओमायक्रॉनची पडताळणी करण्यासाठी मुंबई महापालिकेने 21 आणि 22 डिसेंबरला शहरात कोरोनाबाधित आढळलेल्या 376 रुग्णांचे नमुने कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेत जनुकीय चाचणीसाठी पाठविले होते. यातील 282 रुग्ण हे मुंबईचे रहिवासी होते. मुंबईच्या रहिवाशांमधील 156 रुग्णांना म्हणजेच 55 टक्के रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे आढळले आहे. तर उर्वरित रुग्णांपैकी 13 टक्के रुग्णांना डेल्टा आणि 23 टक्के रुग्णांना डेल्टा वर्गातील कोरोनाच्या रुपाची बाधा झाली आहे.
कोरोनाचा धोका वाढल्याने राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा घालण्यात आली आहे. तर लग्न 50 जणांमध्ये उरकावं लागणार आहे. त्याचवेळी चिंता करण्याची बाब पुढे आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात 2 लाख रुग्ण असणार आहेत. तसा अंदाज राज्याच्या आरोग्य विभागाने वर्तविला आहे. आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
आताच रुग्ण वाढीचा वेग बघता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात दोन लाख रुग्ण होऊ शकतात असा अंदाज पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. (Omicron Updates: Maharashtra may report 2 lakh active Covid cases by January 3rd week ) तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार आहेत. त्यामुळे तिसरी लाट, ओमयक्रोन घातक नाही, सौम्य आहे. याला बळी पडू नका, सतर्क रहा, लसीकरण वाढवा, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. रुग्ण वाढत असले तरी मृत्युचे प्रमाण मात्र कमी आहे. त्यामुळे घाबरुन जाण्याचे कारण नाही, असेही म्हटले आहे.