`जीवन ज्योत प्रतिष्ठान संस्थे`च्या वतीने गणेश मंडळांना श्रींची मूर्ती देणगी स्वरूपात भेट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनोखा उपक्रम
मुंबई : यंदा सगळ्याच सणांवर कोरोनाचं सावट आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने साजरा होणार सण म्हणजे गणेशोत्सव. यंदा या गणेशोत्सवावर देखील कोरोनाची सावट दिसतंय. दरवर्षीप्रमाणे यंदा आपल्याला गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता येणार नाही.
सण साजरा करण्यासाठी अनेक नियमांच पालन करावं लागणार आहेत. तसेच गणेशोत्सवात मोठी आर्थिल उलाढाल होत असते. पण यंदा कोरोनामुळे गणपती मंडळांनी अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना अंधेरीतील जीवन ज्योत प्रतिष्टान संस्थेच्या वतीने गणेश मंडळांना श्री गणेशाची मु्र्ती आणि पुजेचं साहित्य देण्यात येणार आहे.
जीवन ज्योत प्रतिष्टान संस्थेच्या वतीने Covid-19 (Corona virus ) या जागतिक महामारीची परिस्थिती लक्ष्यात घेता सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास हातभार लावण्यात येत आहे. अंधेरी पूर्व भागातील सर्व ३५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश मुर्ती व पूजा सामुग्री देणगी स्वरूपात भेट देण्यात येणार आहे. ह्या मूर्ती २ फूट ते ४ फूट मध्ये असतील. सध्या सर्वच गणेश मंडळांना वर्गणी व आर्थिक गोष्टीना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे हा निर्णय मुरजी पटेल यांच्या मार्फत घेण्यात आला.
#गणपती #बाप्पा #मोरया #मंगल #मूर्ती #मोरया #गणेशोत्सव #प्रसंगी #नको #भपका #फक्त #निव्वळ #भक्ती #करुया #महाराष्ट्राचा #सांस्कृतिक #वारसा #जपण्यासाठी #एक #अभिनव #प्रयत्न
Posted by Murji Patel on Tuesday, June 30, 2020
Covid-19 मुळे उद्भभवलेल्या भयानक परिस्थितीचे भान ठेवून व जनतेच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करीत जीवन ज्योत प्रतिष्ठानमार्फत हे कार्य करण्यात येत आहे. जीवन ज्योत प्रतिष्ठानचे कार्यालय एम आय डी सी येथून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना श्री गणेश मुर्तीचे बुकिंग व वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी व हा गणेशोत्सव कोणताहीअडथळा न येता निव्वळ भक्तिभावाने साजरा व्हावा यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाचे सहकार्य घेऊन उपरोक्त समाजसेवी संस्था कार्यरत आहे.