मुंबई : Governor Appointed MLA : 12 आमदारांचा तिढा सुटण्याबाबत पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत यावेळी राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात, याची मोठी उत्सुकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, अनिल परब, अशोक चव्हाण, सतेज पाटील आदींच्या शिष्टमंडळाने राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी 12 विधानपरिषद आमदारांच्या विषयावर राज्यपालांशी चर्चा झाली. तसेच विधानसभा अध्यक्षपदाकरता परवानगी मिळावी ही विनंती केली.


9 तारखेला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता परवानगी मागितली आहे. ती तारीख सोयीची वाटतेय. राज्यपाल यावर कळवतील. राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाली आहे. येथून पुढेही सकारात्मक उत्तर अपेक्षित, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. राज्यपालांना सांगितलंय की जे झालंय ते मागे टाका, 12 आमदारांची फाईलही क्लिअर करा, असे ते म्हणाले.


दरम्यान, आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ नये, असे जे भाजपचे प्रयत्न आहेत. यावरुन भाजपला आज हायकोर्टाने फटकारले आहे, नाना पटोले यांनी सांगितले.


राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी महाविकास आघाडीतर्फे राज्यपाल यांच्याकडे बंद पाकिटात पाठवण्यात आली. (Nomination of MLCs: Maharashtra govt submits list) मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल हा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेच.


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी 6 नोव्हेंबर 2020 रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. यादी सादर करुन दीड वर्ष होऊनही राज्यपालांनी नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


काँग्रेस
1) सचिन सावंत 
2) रजनी पाटील  
3) मुजफ्फर हुसैन  
4) अनिरुद्ध वनकर 


राष्ट्रवादी काँग्रेस
1) एकनाथ खडसे
2) राजू शेट्टी 
3) यशपाल भिंगे  
4) आनंद शिंदे 


शिवसेना
1) उर्मिला मातोंडकर  
2) नितीन बानगुडे पाटील 
3) विजय करंजकर  
4) चंद्रकांत रघुवंशी