मुंबई : आज दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाची तयारी मुंबईच्या चौपाट्यांवर दिसून येतेय... परंतु, याच वेळी सुरक्षा यंत्रणांनी भाविकांना सावधानतेचा इशारा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. पहाटे ५.३० वाजेपर्यंत कुलाब्यात ३२.८ मिमी पावसाची नोंद झालीय. तर सांताक्रुजमध्ये ८५.५ मिमी पावसाची नोंद झालीय.


दरम्यान आज दुपारी २.५५ वाजता समुद्राला भरती येणार आहे. ४.११ मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यातच आज दीड दिवसाच्या घरगुती गणपतींचं विसर्जनही आहे. त्यामुळं सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. मुंबई शहर आणि उपनगरांत काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल, असा अंदाज आहे.


दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन


घरोघरी दीड दिवसासाठी पाहुणा आलेल्या लाडक्या बाप्पाचं आज विसर्जन होणार आहे. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबईसह ठिकठिकाणी प्रशासनानं चोख व्यवस्था केलीये. अनेक शहरांमध्ये कृत्रीम तळी उभारण्यात आलीत.. दिड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिस यंत्रणेनंही विशेष काळजी घेतलीये.. एकुणच आज समुद्रकिना-यावरचं वातावरण हे बाप्पांच्या निरोपामुळे गणेशमय होणार आहे..