मुंबई : देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण अजूनही वाढत आहेत. त्यातच गृहविभागातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. संबंधित अधिकार्‍याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत मंत्रालयातील ५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मंत्रालयातील २ सफाई कर्मचारी, एक PWD विभागातील कंत्राटी कामगार तर एक अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉक्टरला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सर्वाधिक रुग्णांची वाढ ही मुंबईत होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. 


मुंबईत रविवारी कोरोनाचे ४४१ नवे रुग्ण वाढले होते. सोमवारी राज्यात ७७१ नव्या कोरोना रूग्णांची भर पडली होती. तर ३५ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. सोमवारी राज्यात एकूण रूग्ण संख्या १४,५४१ वर पोहचली असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे आतापर्यंत ९३१० रुग्ण आढळले असून आतापर्यंत ३६१ जणांचा मृत्यू झाला आहे.