मुंबई : दसरा मेळाव्यात आणखी एक ठाकरे (Thackeray) राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) बॅनरवरील फोटोमुळं चर्चांना उधाण आलंय. शिवसेनेकडून 'चलो शिवतीर्थ' म्हणत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य आणि आता तेजस ठाकरे (Tejas Thckeray) यांचा फोटो देखील झळकू लागले आहेत. पोस्टरवरुन चर्चा सुरु झाल्या आहेत. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. (Tejas Thackeray will be in politics)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे दसरा मेळाव्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्याचं औचित्य साधत ठाकरे कुटुंब (Thackeray Family) आपला हुकमी एक्का बाहेर काढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. शिंदे गटाने देखील दसरा मेळाव्यावर दावा केल्याने शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट (Shinde vs Thackeray) असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.


दसरा मेळाव्याला दोन्ही गट जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पुढचं आव्हान वाढलं आहे. त्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


शिवसेना दोन गटांत विभागली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता तेजस ठाकरे देखील कार्यकत्यांमध्ये उभारी आणण्यासाठी मैदानात येण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याचा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 


शिवसेना, शिवतिर्थ आणि दसरा मेळावा असं समीकरण राहिलं आहे. पण आता शिवसेनेत 2 गट झाल्याने दोन्ही गट दसरा मेळाव्या घेण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. दसरा मेळाव्यात दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.