देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात
देशात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे वाढते रुग्ण आता चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्या 24 तासांत 3525 नवीन रुग्ण वाढले असून 122 लोकांना मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार आता देशात कोरोना रूग्णांची संख्या 74 हजारांच्या पुढे गेली आहे. आता एकूण पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या 74 हजार 281 झाली असून 2 हजार 415 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासांत 1931 रुग्ण बरे झाले आहेत ही विशेष बाब आहे. आता कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 24 हजार 386 झाली आहे. देशात सध्या 47 हजार 480 रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 24 हजार 427 वर पोहोचली आहे, तर 921 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत येथे 8 हजार 903 रुग्ण वाढली असून 537 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडू तिसर्या क्रमांकावर आला आहे. आतापर्यंत, 8718 रुग्ण आढळले असून 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये आतापर्यंत 7639 रुग्ण आढळले असून त्यामध्ये 86 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजस्थानमध्ये 4126 रुग्ण आढळले असून 117 लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात 3986 रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये 225 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. आता येथे रूग्णांची संख्या 3664 वर पोहोचली असून 82 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आंध्र प्रदेश - 2090 - 46
अंदमान निकोबार - 33
अरुणाचल प्रदेश - 1
आसाम - 65 - 2
बिहार - 831 - 6
चंदीगड - 187 - 3
छत्तीसगड - 59
गोवा - 7
हरियाणा - 780 - 11
हिमाचल प्रदेश - 65 - 2
जम्मू-काश्मीर - 934 - 10
झारखंड - 172 - 3
कर्नाटक - 925 - 31
केरळ - 524 - 4
लद्दाख - 42
मणिपूर - 2
मेघालय - 13 - 1
मिझोराम - 1
ओडिशा - 437 - 3
पुद्दुचेरी - 13
पंजाब - 1914 - 32
तेलंगणा - 1326 - 32
त्रिपुरा - 154
उत्तराखंड - 69
पश्चिम बंगाल - 2173 - 198