मुंबई : दिवाळी तोंडावर आली असताना, राज्यातल्या ग्रामीण भागाला भारनियमनाची झळ सहन करावी लागणार आहे. ग्रामीण भागात पाच ते सात तास आणि शहरी भागांत एक ते दोन तासांचं भारनियमन होण्याची चिन्हं आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हव्या असलेल्या प्रमाणात कोल इंडियाकडून कोळसा उपलब्ध होत नसल्यानं, महानिर्मितीच्या वीजनिर्मितीत घट झाली आहे. राज्यातली विजेची मागणी साडे सतरा हजार मेगावॉटपर्यंत गेली आहे. 


महानिर्मिती कंपनीकडून साधारणपणे साडेसहा हजार मेगावॉट वीज उपलब्ध होणं अपेक्षित असताना, त्यात दोन हजार मेगावॉटहून अधिकची घट झाली आहे. दरम्यान सध्या अडीच हजार मेगावॉटपर्यंत भारनियमन करण्यात येत असून, येत्या दिवसांत त्यात आणखी वाढीची शक्यता आहे.