Onion Prices : दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2022) सध्या अनेकदण नवी खरेदी करताना दिसत आहेत. यामध्ये महिला वर्गाची लगबग सुरुये ती म्हणजे घरातलं वाणसामान भरण्याची. भाजीपाल्याच्या (Vegetable rates) दरांवर नजर ठेवत साठवणीचा कांदा, लसूण (Onion, Garlic) घेण्यासाठीही अनेक गृहिणी बाजाराची वाट धरत आहेत. अपवाद वगळता कांदा जवळपास सर्वच पदार्थांमध्ये वापरला जातो. अनेकजण तर कच्चा कांदा जेवणासोबतच जोडीलाही खातात. पण, आता मात्र हा कांदाच जेवणातून हद्दपार होतो की काय, याचीच भीती व्यक्त केली जात आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे कांद्याचे वाढणारे दर. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत (Mumbai onion prices) साधारण गेल्या 8 महिन्यांपासून स्थिर असलेल्या कांद्याच्या दराने सणासुदीच्या काळातच उसळी घेतली आहे. मागील आठवड्यापर्यंत 7 ते 10 रुपये किलो असलेल्या कांद्याचे दर आता थेट 15 ते 25 रुपये किलोदरम्यान गेले आहेत. काही ठिकाणी कांदा 30 रुपयांहूनही जास्त किमतीला विकला जात आहे. 


अधिक वाचा : Petrol Price Today : मोदी सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या


 


दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वीच कांद्याच्या दरांमध्ये होणारी वाढ पाहता जिथं मेजवानीचे बेत आखायचे तिथेच हा कांदा जेवणातून हद्दपार होणार की काय, असाच प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. 


बाजारात नवा कांदा येण्यासाठी आणखी दीड महिन्याचा काळ जाईल. त्यातही कांद्याचा उपलब्ध साठाही खराब होत असल्यामुळं अडचणी निर्माण होत आहेत. त्यातच मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळं आता सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसताना दिसत आहे. 


अधिक वाचा : Uniform Civil Law : महाराष्ट्रात समान नागरी कायदा?


आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असणाऱ्या लालसगावमध्येही कांद्याच्या दरांचा (Onion rates) आलेख वाढत असल्यामुळं आता तुमच्या घरानजीक असणाऱ्या बाजारपेठांमध्येही कांदा रडवणार अशीच चिन्हं दिसत आहेत. ही दरवाढ फक्त बाजारपेठांपुरताच मर्यादित न राहता आता याचे परिणाम अगदी रस्त्यावरील एखाद्या दुकानात मिळणाऱ्या भजीपासून ते अगदी हॉटेलमध्ये (restaurants) मिळणाऱ्या पदार्थांवरही होणार का हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.