कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांचेच नेतृत्त्व सर्वव्यापी ठरू शकते. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहूल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की,  काँग्रेस हा देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता त्यांनी जमिनीवरचे काम सुरू करायला हवे, असे मत यावेळी संजय राऊत यांनी मांडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधींनी लवकर हालचाली कराव्यात, अन्यथा.... शिवसेनेचा इशारा


तसेच भविष्यात उद्धव ठाकरे यांनी बिगरभाजपशासित राज्यांचे नेतृत्त्व करायला पाहिजे, असेही राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येवून लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी बुधवारी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत मांडली. 


शिवसेनेकडून गांधी कुटुंबीयांची पाठराखण; महाराष्ट्रातील 'या' काँग्रेस नेत्याला लगावला टोला

यावेळी राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्या नाराजीसंदर्भातही भाष्य केले. तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी ही असतेच. मात्र, आता संजय जाधव मुंबईत आल्यामुळे यामधून मार्ग निघेल. सध्याच्या घडीला महाविकासआघाडीत उत्तम समन्वय आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणत्याही समन्वय समितीची गरज वाटत नसल्याचेही राऊत यांनी सांगितले.  


राज्यातील मंदिरे, जीम लवकरच सुरु होणार
राज्यातील मंदिरे आणि जीम सुरू करण्याबाबत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो, असं संजय राऊत यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे सप्टेंबरपासून राज्यातील जनजीवन सामान्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.