विधिमंडळात विरोधकांचा आवाज दाबला जातोय, सरकारवर आरोप
राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल चर्चा करायची असूनही सरकार मुद्दाम टाळाटाळ करत आहे. विरोधकांना बोलू दिलं जात नाही. महत्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यासाठी सरकार मुद्दाम कामकाज तहकूब करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
दरम्यान, विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकच गोंधळ घालत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, सरकारच्या या वागण्याला वैतागलेल्या विरोधांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार सुरू केला आहे.