मुंबई : मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती बाबत बोलताना संयम बाळगणं गरजेचं आहे. भाजपचा राणे यांच्या विधानाला पाठींबा देणार नाही मात्र राणे यांच्या पाठीशी असेल. असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना व्यक्त केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थीती निर्माण झाली आहे. आता याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलण्याच्या ओघात राणे बोलले असावे, असं बोलावं त्यांच्या मनात असेल असं वाटतं नाही... असं म्हणत फडणवीसांनी राणेंची पाठराखण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फडणवीस म्हणीले, 'मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणे यांनी जे विधान केलं त्यातून मोठा वाद निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणे यांनी जे विधान केलं त्यातून मोठा वाद निर्माण झाला. बोलण्याच्या ओघात राणे बोलले असावे, असं काही बोलावं त्यांच्या मनात असेल असं वाटतं नाही. मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीबाबत बोलताना संयम बाळगणं गरजेचं आहे असं मत फडणवीसांना व्यक्त केलं. 


पुढे फडणवीस महणाले, ' मुख्यमंत्री स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी विसरतात यामुळे एखाद्याला संताप येऊ शकतो, पण वेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त करता येऊ शकतो. भाजपचा राणे यांच्या विधानाला पाठींबा नाही मात्र राणे यांच्या पाठीशी असेल. आता  गुन्ह्याला कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न याठिकाणी सुरू आहे. 


पोलिसांचा गैरवापर सुरू आहे, नाशिक आयुक्त हे स्वतः छत्रपती समजतात का? असा प्रश्न देखील फडणवीसांनी उपस्थित केला. कायदा योग्य असेल तर कारवाई केलीच पाहिजे, मात्र सरकारला।खुश करण्यासाठी कारवाई होत असेल तर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळेल. अर्णब, कंगना अशा अनेक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला चपराक बसली आहे. मी पोलिसांना धमकी नाही तर सल्ला देतो की कायद्याने काम करा... असा सल्ला फडणवीसांनी पोलिसांना दिला.