शरद पवारांच्या घरी उद्या विरोधकांची बैठक
उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे.
मुंबई : उद्या शरद पवारांच्या घरी विरोधकांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. उद्या भाजप सरकारचा शेवटला अर्थसंकल्पही सादर होणार आहे. त्यामुळे मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
२०१९ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यावर विरोधकांना एकजुट करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. यासंदर्भात ही बैठक आहे. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं महत्वाचं मानलं जात आहे. पण राहुल गांधींऎवजी शरद पवार यांच्यावर ही जबाबदारी आल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहे.
याआधीही झाली होती बैठक
याआधी सोमवारीही विरोधी पक्षांच्या नेत्यांची पवारांच्याच घरी बैठक झाली होती. 26 जानेवारीला मुंबईत विरोधीपक्षांनी संविधान मोर्चा काढला. त्यावेळी विरोधकांच्या एकजुटीनंतर आता दिल्लीतही अशाच प्रकारे मोर्चा काढण्याची तयारी सुरू झालीय.