Mumbai Police : मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) बार आणि रेस्टॉरंट मालकांकडून खंडणी उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. याला वर्ष होत नाही तोच आता मुंबईतील काही ऑर्केस्ट्रा आणि डान्सबार मालकांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. बारमध्ये येऊन पोलीस बसतात, महिला डान्सर आणि गायकांचे फोटो काढतात, इतकंच नाही तर काही पोलीस चक्क तिथल्य सोफ्यावर झोपतात असा आरोप बार मालकांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा मुदतीपूर्वीच बार बंद करण्यास सांगितलं जातं, या सर्व प्रकारामुळे बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर मोठा परिणाम झाला असल्याचं बार मालकांचं म्हणणं आहे. 


वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिला असून आपण त्याचं पालन करत असल्याचं पोलीस सांगतात आणि बारमध्ये येऊन त्रास देतात असं बार मालकांचं म्हणणं आहे. मुंबईत एकूण 259 ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार आहेत. पोलीस रात्री नऊ वाजल्यापासूनच फेऱ्या मारायला लागतात. महिला डान्सर आणि गायकांचे फोटो काढतात. त्याचा व्यावसायावर परिणाम झाला आहे. 


याबाबत बारमालकांनी AHAR कडे तक्रार केली आहे. लॉकडाऊमुळे हॉटेल उद्योगावर वाईट परिणाम झाला आहेत. आता महाराष्ट्र सरकारने सर्व निर्बंध उठवले आहेत. पण पोलिसांच्या अशा भूमिकेमुळे ग्राहक बारमध्ये येत नाहीत, असं या तक्रारीत म्हटलं आहे. 


अनेकवेळा पोलीस बारमध्ये येतात आणि सोफ्यावर झोपतात अशी तक्रारही करण्यात आली आहे. दरम्यान, असा कोणताही आदेश दिलेला नाही अस एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.