अनुराग शाह, झी २४ तास, मुंबई : ऑनलाईन व्यवहार करत असाल तर जरा काळजी घ्या, कारण ओटीपी फ्रॉड करणाऱ्या घोटाळेबाजांचा काळा धंदा वाढत चाललाय. तुम्ही एखादी ऑनलाईन ऑर्डर दिलीत आणि त्याचं ऑनलाईन पेमेंट करायला गेलात तर तुमचा अख्खा अकाऊण्ट काही सेकंदांमध्ये रिकामा होऊ शकतो. गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना मुंबईत घडल्या आहेत. नीट लक्षात घ्या, कशी असते या फ्रॉडर्सची मोडस ऑपरेंडी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन वस्तू किंवा ऑनलाईन फूड विकणाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन फ्रॉड करणारे कॉन्टॅक्ट एडिट करुन स्वतःचे कॉन्टॅक्ट घालतात... ऑर्डरसाठी फोन आला की संबंधित व्यक्तीला ओटीपी अर्थात 'वन टाईम पासवर्ड' पाठवला जातो. ग्राहकाला फोनवर ओटीपी विचारला जातो आणि पुढच्या काही सेकंदांमध्ये अकाऊण्टमधून पैसे लंपास केले जातात. आत्तापर्यंत अनेक ग्राहकांना आणि दुकानदारांनाही या ओटीपी फ्रॉडचा फटका बसलाय. 


यावर्षात सत्तह हजार कोटींचे ६८०० बँकिंग फ्रॉड झालेत. ग्राहकांनो सावध राहा, कुठल्याही परिस्थितीत कुणालाही ओटीपी शेअर करु नका, असं आवाहन महाराष्ट्र सायबर पोलीस अधिक्षक बालसिंह राजपूत यांनी केलंय.