मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेलया हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्याच ताब्यात असलेल्या गृहखात्याला चांगलेच झोडपलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार यांच्या बाबत जे घडले ते कुणाही बाबत होता कामा नये. मग तो आमचा सर्वसामान्य नागरिक असो,  कुठल्याही पक्षाचा नेता व कार्यकर्ता असतो किंवा स्वतंत्र विचाराचा व्यक्ती असो, अशी घटना घडता कामा नये.


आपली महाराष्ट्राची परंपरा, शिकवण आहे की लोकशाही मार्गाने आपला निषेध करावा. मात्र, यामागे कोण आहे याच्या शेवटपर्यंत निश्चितपणे जाऊ. त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असे अजित पवार म्हणाले. 


हे पोलिसांचे एक प्रकारचे अपयश आहे. ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडते तिथे मीडिया दिसते. ज्या अर्थी तिथे दगड मारतात किंवा काही करतात. ते मीडियात आलेले आहे. याचा अर्थ इतरांना काही तरी माहित असले पाहिजे.


संपकरी यांनी बारामतीमध्ये जाणार असं म्हटलं होतं. पोलिसांमध्येही काही वेगवेगळी प्रकारची यंत्रणा असते. त्यामुळे त्यांना हे माहित असायला पाहिजे. सर्वाच्याच बाबतीत काळजी घेणे गरजेचे होते, पण ती घेतली गेली नाही असं अजित पवार म्हणाले.