शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटली, `हार्बर` ठप्प
शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतुक सेवा ठप्प झाली आहे.
मुंबई : शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर मार्गावरील दोन्ही बाजुची वाहतुक सेवा ठप्प झाली आहे.
कामाच्या वेळा सुरू होत असतानाच या घटनेमुळे प्रवाशांचा खोळंबा होत आहे. सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ही वाहतुक ठप्प आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन
ओव्हरहेड वायर तुटुन वाहतूक खोळंबा होण्याचे प्रकार वारंवार समोर येताना दिसत आहे.
दरम्यान हे वेळेवर सुस्थितीत आले नाही तर परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडणार आहे.
त्यामुळे विशेषत: बोर्डाच्या परिक्षेला जाण्याऱ्या विद्यार्थ्यांनी त्या वेळेनुसार निघाव असे आवाहन करण्यात येत आहे.