JNPT Port: जेएनपीटी बंदरावर भारतीय सुरक्षा दलानं मोठी कारवाई केलीय. चीनहून पाकिस्तानला संशयास्पद साहित्य घेऊन जाणारं जहाज सुरक्षा जवानांनी अडवलं. पाकिस्तान या साहित्याचा उपयोग क्षेपणास्त्र बनवण्यासाठी करेल असा संशय व्यक्त केला जात आहे.  गृप्तहेरांनी सीमा शुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाविषयीची माहिती दिली होती. त्यानंतर सतर्क झालेल्या सुरक्षा रक्षकांनी जहाज अडवलं. हे जहाज चीनहून पाकिस्तानातील कराचीला जात होतं. जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते. डीआरडीओच्या टीमद्वारेही जहाजावरील वस्तूंची तपासणी करण्यात आलीय.


कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशिन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी 23 जानेवारीला कारवाई केली होती. यामध्ये माल्टाचा ध्वज लावलेल्या कराचीला जाणाऱ्या सीएमए सीजीएम अत्तिला या व्यापारी जहाजाला जेएनपीटी येथे रोखण्यात आले. जहाजाची तपासणी करण्यात आली. यामध्ये एक कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीनदेखील होती. ही मशिन मूळत: इतालवी कंपनीने बनवली होती. सीएनसी मशिन एका कॉम्प्युटरच्या माध्यमातून चालते. ज्या माध्यमातून अशी दक्षता, स्थिरता आणि अचूकता मिळते जी मॅन्युअली शक्य नसते. 


पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात या साहित्याचा उपयोग केला गेला असता असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 1996 मध्ये सीएनसी मशिनला वासेनार यंत्रणेमध्ये सहभागी करण्यात आले होते. वासेनार एक आंतरराष्ट्रीय हत्यार नियंत्रण यंत्रणा असून याचा उद्देश नागरिक आणि सैन्य दोघांनाही हत्यारांच्या उपयोगापासून रोखणे असा आहे. 
भारत हा अशा 42 सदस्यांच्या राष्ट्रांपैकी एक आहे. ज्यामध्ये पारंपारिक शस्त्रास्त्रे आणि दुहेरी वापराच्या वस्तू आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणाबाबत माहितीची देवाणघेवाण होते. सीएनसी मशीनचा वापर उत्तर कोरियाने आपल्या अणुकार्यक्रमात केला होता.


CMA CGM Attila सीएमए सीजीएम अॅटीला नावाचे जहाज पाकिस्तानातील कराचीला जाणार होते.  DRI ने कारवाई करत  23 जानेवारीला न्हावा शवा बंदरात हे जहाज थांबवले होते. त्यानंतर 24 जानेवारीला जहाजातून कंटेनर उतरवला आणि जहाजाला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पुढे १६ फेब्रुवारी रोजी हैदराबाद ते डीआरडीएलच्या टीमने कंटेनर उघडला आणि कंटेनरमधील सामग्रीची तपासणी सुरू केली. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  


या कार्गोमध्ये हाय-टेक सीएनसी लेथ मशीन आहे, ज्याचा वापर संरक्षण आणि अंतराळात वापरण्यात येणारी उच्च अचूक साधने बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली. हा माल सध्या न्हावा शेवा बंदरात अडवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. 


भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांकडून खुलासा 


बंदर अधिकाऱ्यांनी संशय आल्याने त्यांनी भारतीय संरक्षण अधिकाऱ्यांना सतर्क केले. यानंतर अधिकाऱ्यांनी तपासणी करुन माल जप्त केला. बिल आणि इतर कागदपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार  जहाजात शांघाय जेएक्सई ग्लोबल लॉजिस्टिक कंपनी लिमिटेडने सियालकोटच्या पाकिस्तान विंग्स प्रायव्हेट लिमिटेडला माल पाठवला होता.


संशय बळावल्याने सुरक्षा यंत्रणांनी जहाजातील मालाचा सखोल तपास केला. यामध्ये तैयुआन मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनी लिमिटेडने पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनिअरिंगला 22 हजार 180 किलो वजनाची खेप पाठवली होती.