पेंटाग्राफ तुटून रेल्वेचे ६ प्रवासी जखमी, वाहतुकही विस्कळीत
अपलाईन गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी ही घटना घडली.
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटग्राफ तुटून प्रवाशांना लागला, यात तब्बल ६ प्रवासी जखमी झालेत.
अपलाईन गेल्या तासाभरापासून ठप्प असल्याचं सांगण्यात येत आहे. आज शनिवारी दुपारी ही घटना घडली.
मुंबई आणि उपनगरात पाऊस होत असताना, पेंटाग्राफ बिघडल्याने वाहतूकही खोळंबली आहे. वाहतूक लवकरच सुरळीत होईल अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.