Paramvir Singh on Anil Deshmukh: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोपींच्या फैरी झाडल्या जात आहेत.माझ्याकडे माणूस पाठवून मला ब्लॅकमेलिंग करण्यात आल्याच आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केला. यानंतर अ‍ॅंटिलिया खटल्यातील आरोपी सचिन वाझेने अनिल देशमुखांवर आरोप केले. आता परमवीर सिंह यांनीदेखील अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस विभागावर दबाव तंत्र टाकणारे महाविकास आघाडीचे गलिच्छ सरकार होते.असे मी माझ्या 34 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये पाहिले नाही आणि पुढे पाहणार नाही असे परमवीर म्हणाले. 'झी 24 तास'ला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते.


पैसे जयंत पाटलांकडे जमा करण्याचे आदेश 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल देशमुख यांच्या मुलाने माझी पाया पडून माफी मागितली होती. माझ्याशी पंगा घेतील तर मी ही तयार आहे. माझ्या बरोबर पंगा घेतला तर मग मीपण तयार आहे. मी देशमुख यांचे 10 ते20 टक्केच  प्रकरण बाहेर काढले आहे ,वेळ आल्यावर सर्वच बाहेर काढेन असा इशारा परमवीर यांनी दिलाय. अॅंटेलिया प्रकरणाच्या दबावामुळे मी आता बोलतोय असे नाही तर माझ्यावर अनिल देशमुख यांनी बिनबुडाचे आरोप केलेयत, त्याचे खंडन करण्यासाठी मी बोलोय. मुंबईमधून 100 कोटी रुपये जमा करून देण्याचे टार्गेट होते आणि हे सर्व पैसे जयंत पाटील यांच्याकडे जमा करायला लागातील असे देशमुख यांनी मला सांगितले होते 


वसुलीचे माझ्याकडे पुरावे 


हा वसुली प्रकार माझ्या समोर आल्यावर मी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,शरद पवार आणि जयंत पाटील यांना याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझे ऐकले नाही उलट त्यांना सर्व गोष्टी या माहिती होत्या. वसुली प्रकरणी माझ्याकडे पुरावे आहेत. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील हा हॉटेलमध्ये बसून वसुलीचे काम करायचा. 


ठाकरे-पवारांचा माझ्यावर दबाव 


मलाही अनेक गुन्ह्यात गोवण्यासाठी अनेक गुन्हेगारांची मदत घेण्यात आली. त्यांच्या बैठका अनिल देशमुख यांच्याकडे व्हायच्या.मला गिरीश महाजन ,दरेकर यांना कोणत्यातरी केसमध्ये अटक करण्यासाठी दबाव होता. दरेकर यांनी बँक प्रकरणात अडकवण्यासाठी मातोश्रीवर बैठक झाली होती.फडवणीस आणि एकनाथ शिंदे यांनाही केस मध्ये गोवण्यासाठी माझ्यावर दबाव होता. शिंदे यांच्या पक्षातील लोकच त्यांना अडकवण्याचे काम करत होते. उद्धव ठाकरेंनी तसे करायला सांगितले होते. राजकीय अडकवण्या बाबत सिल्वर ओक वर ही बैठका झाल्यात. मातोश्री वरून उद्धव ठाकरे आणि सिल्वर ओकवरून शरद पवार यांचा दबाव होता.


मी नार्को टेस्ट करायला तयार


मी हे सर्व निवडणूकांच्या धर्तीवर बोलत नाही तर देशमुखांनी माझ्यावर आरोप केले म्हणून बोलतोय.माझा राजकारणशी काही संबंध नाही. ते निवडणुकीच्या तोंडावर असे माझ्यावर आरोप का करतायत? महाविकास आघाडीतील नेत्यांनी देशमुखांना समजावा.मी नार्को टेस्ट करायला तयार आहे.एकाच दिवशी माझी, अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाची टेस्ट करावी. ते तयार आहेत का ? असा प्रश्न त्यांनी विचारला.