मुंबई : २४ तास डॉट कॉमने केलेल्या 'फेसबुक LIVE' मध्ये प्रवाशांनी रेल्वेच्या मृत्यूच्या पायऱ्यांवर संपात व्यक्त केला आहे. 24 तास डॉट कॉमने थेट घटनास्थळी तसेच केईएम रूग्णालयात जाऊन प्रत्यक्षदर्शी तसेच प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेतल्या, यात अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशांसनावर संताप व्यक्त केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परळ स्टेशनवरून वर जातानाच्या पायऱ्या या नेहमीच वर्दळीच्या वेळी कमी पडतात, रोजच येथे चेंगराचेंगरीचा प्रश्न निर्माण होतो. गर्दीच्या वेळेत पोलीस नसले, तर राम भरोसे हा रस्ता पार करावा लागतो, यात कुणाचा धक्का कुणाला लागला तर यावरून वाद होवू शकतात, एवढंच नाही, पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचेही भान ठेवावे लागते.


परळ ते एलफिन्स्टला जोडणारा एकचा पूल पुरेसा नाही, या पायऱ्या पार करताना गर्दीच्या वेळेत या मृत्यूच्या पायऱ्या वाटतात असा संताप प्रवाशांनी केला आहे.