पाथरी विकास आराखड्यातून साई `जन्मस्थळ` हा उल्लेख काढून टाकणार
पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असं नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असं नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून टाकण्याचं मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांबरोबरच्या बैठकीत मान्य केलं आहे. पाथरीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते. त्या विकास आराखड्याच्या नावात साई जन्मस्थळ असा उल्लेख केल्यानं हा वाद निर्माण झाला होता.
साईबाबांनी कधीच जन्मस्थळाचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे तो उल्लेख काढून टाकावा, अशी मागणी करत शिर्डीकर संतप्त झाले. शिर्डीत याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांची बैठक बोलावली होती.
या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेंसह शिर्डीकर उपस्थित होते. बैठकीनंतर समाधान झाल्याची प्रतिक्रिया शिर्डीकरांनी दिली आहे. मात्र हा वाद अजून मिटला नसल्याचंही दिसून आलं आहे.