आणीबाणीत कारावास भोगलेल्यांना पेन्शन
आणीबाणीत तुरुंगात गेलेल्यांना मिळणार एवढी पेन्शन
मुंबई : आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या व्यक्तींना दहा हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. एक महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगलेल्यांना १० हजार रूपये तर एक महिन्यांपेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना ५ हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या व्यक्तींच्या गौरवार्थ धोरण ठरवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीची बैठक महसूलमंत्र्यांच्या दालनात झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या पेन्शन योजनेसाठी काही निकषही ठरवण्यात आले आहेत.