Petrol Price : पेट्रोल-डिझेलचे आजचे दर, जाणून घ्या !
जाणून घ्या पेट्रोलची किंमत
मुंबई : अर्थसंकल्प सादर होण्याआधी पेट्रोल आणि डिझेलचे दर सोमवारी सलग ५ व्या दिवशी स्थिर राहीले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती दोन आठवड्यांपासून स्थिर आहेत. कच्चे तेल ब्रेंट क्रूडची किंमत दोन आठवड्यांपासून प्रति बॅरल 56.64 डॉलरहून कमी होऊन 54.48 डॉलर प्रति बॅलर राहीली. जानेवारी महिन्यात दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.50 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली. पेट्रोलची किंमत सर्वोच्च आहे.
मुंबईत पेट्रोल 92.86 रुपये प्रति लीटर आहे. दिल्लीमध्ये 86.30 रुपये प्रति लीटर, चेन्नईमध्ये 88.82 रुपये प्रति लीटर आहे. मुंबईत डिझेलची किंमत 80.08 रुपये प्रति लीटर आहे. दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत डिझेलची किंमत क्रमश:76.48 रुपये, 83.30 रुपये आणि 81.71 रुपये प्रति लीटर आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.