मुंबई : पेट्रोलच्या दरात ११ तर डिझेलच्या दरात ५ पैशांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे भाव नव्वदी पार पोहोचलेत. मुंबईत पेट्रोल मुंबईत ९०.०८ रूपये तर डिझेल ७८.५८ रूपयांवर पोहोचलंय. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कोसळणारा रूपया आणि त्याचवेळी कच्चा तेलांच्या किंमतीत होणारी वाढ यामुळे पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.


कच्चा तेलाचं उत्पादन


 देशातल्या चार मेट्रो शहरांचा विचार केला तर मुंबईत व्हॅटमुळे सर्वात महाग दराने पेट्रोल विकलं जातंय. ऑगस्ट महिन्यात ओपेक या तेल उत्पादक देशांच्या समुहाने कच्चा तेलाचं उत्पादन घटवलंय. त्यानंतर कच्चा तेलाच्या किंमती ८० डॉलर प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.