पेट्रोल- डिझेलचे दर आणखी कमी होणार
वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : वाहन धारकांसाठी एक चांगली बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क केंद्र सरकारने दोन रुपयांनी कमी केल्यानंतर आता राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट पाच टक्क्यांनी कमी करावा यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
इंधनाच्या किमतीत ५० टक्क्यांहून अधिक हिस्सा केंद्र आणि राज्यांच्या करांचा असतो. नोटाबंदी आणि जीएसटीपाठोपाठ इंधनाच्या किमतीत वाढ झाल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. यानंतर वित्त मंत्रालयाकडून करांना कात्री लावण्यास तयार नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतल्यानंतर दर कमी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.