`महाराष्ट्रात आगामी काळात भाजपविरोधात मोठे बंड` - शरद यादव
देशात आज भाजपविरोधात अस्वस्थता आहे तशी महाराष्ट्रात शिवसेना पण अस्वस्थ आहे. आगामी काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठे बंड होईल असे सुचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलंय.
मुंबई : देशात आज भाजपविरोधात अस्वस्थता आहे तशी महाराष्ट्रात शिवसेना पण अस्वस्थ आहे. आगामी काळात महाराष्ट्रात सगळ्यात मोठे बंड होईल असे सुचक विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केलंय.
याचवेळी शरद यादव यांनी, आमचे ठाकरे कुटुंबियांबरोबर कौटुंबिक संबंध आहेत असं विधान केल्यानं खळबळ माजलीय.
जेडीयूचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी लालुप्रसाद यादव यांचीही भेट घेतली. वांद्रे-कुर्ला संकुलातील एशियन हार्ट रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास शरद यादव यांनी ही भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी उशीरा शरद यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचीही भेट घेतली.