PM मोदी यांचा मोठा निर्णय, स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारणार
PM मोदी यांचा मोठा निर्णय, स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पाहा कुठे असेल हे
मुंबई : प्रजासत्ताक दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्याआधी 23 जानेवारी रोजी त्यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्या ठिकाणी होलोग्रामचं अनावरण करण्यात येणार आहे.
होलोग्राम कसा असणार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई इथे इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा प्रजासत्ताक दिनापूर्वी केली आहे. इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाइटचा पुतळा उभारण्यात येणार आहे. यावेळी संपूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जोपर्यंत नेताजींचा पुतळा तयार होत नाही तोपर्यंत होलोग्राम प्रतिमा लावण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून दिली आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्ताने त्याचं अनावरण करण्यात येईल असं मोदी म्हणाले.
इंडिया गेटवर गेली 50 वर्षे धगधगत असलेली अमर जवान ज्योती आज (शुक्रवारी) राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जळत असलेल्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे. म्हणजेच इंडिया गेटवर बांधलेली अमर जवान ज्योतीची सदैव प्रज्वलित मशाल आता 50 वर्षांनंतर कायमस्वरूपी राष्ट्रीय युद्ध स्मारक मशालीमध्ये विलीन होणार आहे.
इंडिया गेटवर गेली 50 वर्षे प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जळत असलेल्या ज्योतीमध्ये विलीन होणार आहे. 25 फेब्रुवारी 2019 मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आता तिथे प्रज्वलित असलेल्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योत विलिन करण्यात येणार आहे.