मुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक ठेवीदार, खातेदारांनी आंदोलन कारण्याचा निर्णय घेतला आहे. हे आंदोलन उद्या २२ रोजी सकाळी १०.३० ते ३ या वेळत मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात येणार आहे. या आंदोलनात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई विभागातील २१ गुरूद्वार एकत्र येऊन हे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या आंदोलनाच्या निमित्ताने बॅंक खातेदार मोठे शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिख समुदायाने आपली ताकद दाखविण्याचा निर्णय घेतला असून मोठे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यालयातमध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. 


शुक्रवारी PMC बँकेच्या पाचव्या खातेधारकाचा मृत्यू झाल्यानंतर, संतापलेल्या खातेदाराकांनी एशियाटिक लायब्ररी समोर PMC बँकेच्या खातेधारकांनी मोर्चा काढला होता. PMC बँकेतील पैसे मिळावेत यासाठी गेली काही दिवस खातेधारक आंदोलन करत आहेत. अजून किती बळी घेणार असा प्रश्न खातेधारक विचारत आहेत. बँकेचे खातेदार यामुळे अधिकच संतप्त झाल्याचं पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आपली ताकद  दाखविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.


आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्या आहे. ज्यामुळे खातेधारकांना ठराविक रक्कमच बँकेतून काढता येत आहे. पीएमसी बँकेत अनेकांचा पैसे अडकले आहेत. त्यामुळे खातेधाकरांची गैरसोय होत आहे. आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याने खातेधारकांकडून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.


पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेमुळे देशातील १७ लाख खातेदार अडचणीत आले आहेत. पीएमसी बँकेतील ही १७ लाख खाती नाहीत तर ही १७ लाख कुटुंब आहेत. या कुटुंबांच्या आर्थिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुरलीधर धारा हे पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचे तिसरे बळी ठरले आहेत. याअगोदर फटतो पंजाबी आणि संजय गुलाटी या दोन खातेधारकांचा तणावामुळे मृत्यू झाला होता.