मुंबई : घोटाळ्याप्रकरणी आर्थिक निर्बंध घालण्यात आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेबाबत भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ३० ऑक्टोबर रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे. ३० ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज बँके ठेवीदारांनी आज आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी आरबीआयने पीएमसी खातेधारकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी ३० ऑक्टोबर रोजी याबाबत निर्णय जाहीर होईल, असे आश्वासन दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँक खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आज पीएमसी खातेदारकांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, आरबीआयने २५ आणि २७ ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे. तर ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असेही आश्वासन यावेळी आरबीआयने दिले आहे.


दरम्यान पीएमसी बँक घोटाळाप्रकणी अटकेत असणाऱ्या आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांच्या कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरबीआयने पैसे काढण्यावर निर्बंध आणल्याने अनेकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक खातेधारक चिंतेत आहेत. पैसे मिळत नसल्याने घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची फी कशी भरायची ही चिंता आहे. आतापर्यंत सहा जणांचा धक्कामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.