मुंबई : पीएमसी बँक खातेधारकांनी आपले पैसे परत मिळावे, यासाठी आता आक्रमकपणा अवलंबिला आहे. आज खातेधारकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर आंदोलन केले आहे. आमचे पैसे लवकरात लवकर द्या, या मागणीसाठी बँक कातेधारकांनी हे आंदोलन केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीएमसी बँकेच्या खातेधारकांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या आंदोलन कर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आमचे पैसे लवकरात लवकर द्या, अशी मागणी केली. 


या आधीही पीएमसी खातेदारकांनी स्वतःचे पैसे मिळावे, यासाठी अशाप्रकारे आंदोलन केली आहेत. आचारसंहिता होती त्यामुळे खातेधारक गप्प बसले होते. मात्र, निवडणुका संपल्याबरोबर शांततेत आंदोलन करण्यासाठी जात असताना त्याचवेळी पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यात ताब्यात घेण्यात आले.