`पीएनबीनं`च उघड केला नीरव मोदीचा अपहार
नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.
मुंबई : नीरव मोदीनं अपहार केल्याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेनं पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय.
पंजाब नॅशनल बँकेनंच मोदीचा अपहार उघडकीस आणला असल्याचा दावा पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी केलाय.
या अपहाराची बँकेनं चौकशी करून ईडी आणि सीबीआयला कळवून गुन्हे दाखल केल्याची माहितीही पीएनबीनं दिलीय. पंजाब नॅशनल बँक आर्थिक संकटात नसल्याचा खुलासाही पत्रकार परिषदेत करण्यात आलाय.
दरम्यान, घोटाळ्याच्या बातमीनंतर पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झालीय. काल आणि आज मिळून एकूण १८ टक्के घसरण झालीय.
अधिक वाचा : नीरव मोदीच्या मालकीच्या ९ ठिकाणी छापे
अधिक वाचा : 'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार