मुंबई : ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांचं निधन झालंय.  वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.. कवयित्री शिरीष पै आचार्य अत्रे यांची कन्या होत्या. जपानी हायकू पद्धतीच्या कविता मराठी साहित्यात आणण्याचं मोठं योगदान शिरीष पैनी दिलंय. त्यांचे एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतूचक्र असे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आचार्य अत्रेंच्या कन्या असल्यानं साहित्याचं बाळकडू त्यांच्या लहानपणी मिळालं होतं. त्याचा परिणाम म्हणून पुढे त्यांनी त्यांच्या साहित्य प्रवासात लहान मुलांच्या लिखाणापासून ललित लिखाणापर्यंत अनेक प्रकारचे लिखाण केले. 


त्यांनी लालन बैरागिण, हे ही दिवस जातील, या कांदंबऱ्या,आईची गाणी, बागेतल्या जमती हे बालसाहित्य सुद्धा गाजलं. ललित साहित्यात मुसाफिरी करताना त्यांनी आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मलाही, अशी पुस्तकं गाजली.