मुंबई : भायखळा पोलीस वसाहतीत राहणा-या दोन पोलिसांच्या घरीच चोरी झाल्याची घटना घडली आहे. ३० जूनला या पोलिसांच्या घरांची कुलुपं तोडून चोर घरात घुसले होते. या चोरांनी सरकारी पिस्तूल आणि ३० राऊंड चोरी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलीस वसाहतीत राहणा-या अंमलदार मोहितेंच्या घरातून एक पिस्तूल आणि ३० राउंड चोरी झाल्यानं पोलीस दलात खळबळ माजली होती. पोलिसांच्या घरातच चोरी झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेचा गुन्हा शाखा आणि एटीएसकडून तपास सुरु होता.


अखेर आंबोली पोलिसांनी सापळा रचून एक तरूण आणि तरुणीला ताब्यात घेतलं. या आरोपींकडून पोलिसांनी सरकारी ९ एमएम पिस्तूल, २७ राउंड आणि ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. या आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.