मुंबई: मुलुंड परिसरातील उच्चभ्रू रहिवासी इमारतीमध्ये एका वृद्ध जोडप्याकडून चालवण्यात येणाऱ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे मुलुंड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हरीष सोता (वय ७२) आणि त्यांची पत्नी देवीबेन सोता (वय ६५) या दाम्पत्याकडून गेल्या दोन वर्षांपासून येथील उच्चभ्रू वस्तीत हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. मात्र, इतके दिवस कोणालाही याचा पत्ता लागला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


घरातील मोलकरणीच्या मदतीने सोता दाम्पत्य हे सेक्स रॅकेट चालवत होते. या मोलकरणीच्या काही मैत्रिणी या रॅकेटमध्ये सहभागी होत्या. ती बाहेरून ग्राहक शोधून आणण्याचे काम करत होती. 


विशेष म्हणजे या प्रकाराची कल्पना सोता यांच्या शेजारच्यांनाही नव्हती. पोलिसांना या सगळ्याचा सुगावा लागल्यानंतर  पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.