मुंबई : 'भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मला अटक करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचा' दावा ट्वीट करून दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. 'माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी तसेच हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबवण्यासाठी घरातून अटक करण्याची गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचा' दावा सोमय्या यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरिट सोमय्या यांच्या घराबाहेर साधारण 100 पोलिसांनी वेढा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  सोमय्या उद्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणी कोल्हापूर येथे जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारकडून दडपशाही सुरू असून मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.



तुम्ही कुठेही जाऊ शकता नाही.  असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. घोटाळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची लोकं करतात. अनिल देशमुख आणि पोलीस कमिशनर फरार आहेत. उलटपक्षी जनतेसाठी लढणाऱ्या किरिट सोमय्याला अटक करतात? ही ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. मी उद्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरात जाणार आहे. अंबाबाईचं दर्शन घेणार आहे. ठाकरे सरकारने कितीही अडवलं तरी कोल्हापूर दौरा करणार असल्याची प्रतिक्रिया किरिट सोमय्या यांनी दिली आहे.



कोल्हापूर प्रशासनाचे आदेश


  • किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत.

  • जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश काढले आहेत.

  • सर्व पोलिस बंदोबस्त गणेश विसर्जनात व्यस्त राहणार असल्याने दौऱ्यासाठी बंदोबस्त पुरवायला दर्शवली असमर्थता

  • राष्ट्रवादी काँग्रेस कडून होणारा विरोध पाहता उद्याचा दौरा रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची विनंती