नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण: श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी
माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी
मुंबई : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जालन्यातून अटक करण्यात आलेल्या माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. कोर्टाने 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. त्याने आरोपींना आर्थिक मदत केल्याचा दावा करण्यात आला आहे.
डॉ. दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणा देखील श्रीकांत पांगारकरचा हात असू शकतो अशी शक्यता एटीएलला आहे. पांगारकर हा जालना नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो औरंगाबादमध्ये राहत असल्याची माहिती आहे. पांगारकरच्या जालन्यातील घराची झाडाझडती देखील घेण्यात आली होती.