खड्डय़ामुळे पोलिसाचा दुर्देवी अंत
खड्ड्यांमुळे सामान्य नागरीकांचे जीव गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. वाशीगाव सिग्नल येथील रस्त्यावर एका पोलिसाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतोष शिंदे (४२) असे यांचे नाव असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. स्ट्रीट लाइट बंद असल्यामुळे काळोखातून रस्त्यावरील खड्डे चुकवत जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा विघ्नेश (१३) आणि मुलगी सई (८) असा परिवार आहे. शिंदे यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई : खड्ड्यांमुळे सामान्य नागरीकांचे जीव गेल्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. वाशीगाव सिग्नल येथील रस्त्यावर एका पोलिसाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. संतोष शिंदे (४२) असे यांचे नाव असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. स्ट्रीट लाइट बंद असल्यामुळे काळोखातून रस्त्यावरील खड्डे चुकवत जाताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगा विघ्नेश (१३) आणि मुलगी सई (८) असा परिवार आहे. शिंदे यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष शिंदे हे सध्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ३१ ऑगस्टच्या रात्री ड्युटी संपल्यावर ते नेरुळला आपल्या घराकडे मोटरसायकलने निघाले. वाशीगाव सिग्नलजवळील उड्डाणपुलापर्यंत ते व्यवस्थित आले. पण स्ट्रीट लाइट बंद असल्याने त्यापुढील परीसरात काळोख पसरला होता. यामध्ये त्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा अंदाज न आल्याने ते मोटरसायकलवरून पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
कार्यतत्पर पोलीस
१९९६ च्या बॅचचे मनमिळावू तसेच कार्यतत्पर पोलीस अशी त्यांची ओळख
बेस्ट डिटेक्शनसाठी पोलीस आयुक्तांनी शिंदे यांचा चार वेळा गौरव
आयुक्तांकडून अन्य २० बक्षिसे
गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर मालमत्ता हस्तगत करण्यामध्ये हातखंडा