मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवरील हल्ले सहन करणार नसल्याचं नमुद केलं. त्याचप्रमाणे गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या पोलिसांना विश्रांतीची गरज असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्वाचं म्हणजे पोलीस प्रचंड तणावाखाली आहेत. त्यांना आता विश्रांतीची गरज असल्यामुळे केंद्रीय सुरक्षा दलाची मदत घेणार असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्राची मदत म्हणजे लष्कर बोलवणे नव्हे हे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे) 


केंद्रीय सुरक्षा दलांची मदत घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं. पोलिसांच्या विश्रांतीसाठी केंद्रीय कुमक मागवण्याचे ंसंकेत देखील मुख्यमंत्र्यांनी या फेसबुक लाईव्हमध्ये दिले. 


पोलीस आपल्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावर उभे आहेत. ते आपल्यासाठी लढत आहेत. आता त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. अनेक पोलिसांच्या तब्बेतीत बिघाड झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. तसेच काही पोलीस बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.  


मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना शिस्त पाळण्यास सांगितलं आहे. शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन वाढेल असे संकेत देखील यावेळी दिले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली तर आपली जबाबदारी वाढणार याची जाणीव देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी करून दिली. मुंबईत लष्कराची गरज नाही पण सर्व नियम पाळणे अत्यंत गरजेचे असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.