मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackarey ) यांनी मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर स्पीकरवर हनुमान चालीसा ( Hnuman chalisa ) वाजवण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. यासाठी ४ मे ही अंतिम तारीख देण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या या आदेशानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनसैनिकांनी आंदोलन केली. या आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलीसांनी ताब्यात घेतले. परंतु, दादर येथे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande ) यांना अटक करण्यात आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढला. या झटापटीत एक महिला पोल्स कर्मचारी जखमी झाली. 


मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ), संतोष धुरी ( Santosh Dhuri ) यांच्या नेतृत्वाखाली दादर येथे राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवास स्थानाजवळ मनसैनिक जमा झाले होते. राज ठाकरे संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत अशी माहिती देण्यासाठी ते 'शिवतीर्थ' बाहेर आले. 


याचवेळी पोलिसांनी त्यांना घेरले. प्रसार माध्यमांच्या गराड्यातून त्यांनी संदीप देशपांडे यांना धरले. त्यांनी देशपांडे यांना बाजूला बोलावले. ते ही दोन चार पावले पोलिसांसोबत पुढे गेले.


येथे एक खासगी कार उभी होती. देशपांडे आणि धुरी यांनी ती कार गाठली. पोलिसांना काही कळण्याआधीच ड्रायव्हरने कर वेगाने पुढे नेली. देशपांडे यांना कारचा दरवाजा बंद करण्याची उसंत मिळाली नाही. त्या चालत्या कारसोबत दोन पोलिस फरफटत पुढे गेले. त्यांनी त्या गाडीच्या मागे धावत ती थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढण्यात देशपांडे आणि धुरी यशस्वी झाले.


दरम्यान, पोलिसांनी संदीप देशपांडे यांना अटक करण्यासाठी शोध मोहीम हाती घेतली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ येथेही क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी शोधाशोध केली.