मुंबई नालेसफाई कामाची निविदा पास होण्यापूर्वीच राजकीय वाद
मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे.
कृष्णात पाटील / मुंबई : महापालिका (Mumbai Municipal Corporation) दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्चून नालेसफाई करते ( Mumbai Nalesafai work) आणि दरवर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबते. यावरून मग राजकीय आरोप प्रत्यारोपही ठरलेले असतात. यंदा तर नालेसफाई (Nalesafai work) कामाची टेंडर पास होण्यापूर्वीच राजकीय वाद रंगण्यास सुरुवात झाली आहे. मिठी नदीसह मोठ्या नाल्याच्या सफाईसाठी बीएमसी पुढील दोन वर्षात 132 कोटी 40 लाख रुपये खर्च करणार आहे. (Political controversy before the tender for Mumbai Nalesafai work is passed)
विशेष म्हणजे पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तब्बल 13 ते 29 टक्के कमी दराने कंत्राटदारांनी नालेसफाईची तयारी दाखवली आहे. एकीकडं महागाई वाढत असताना आणि इंधनाचे दर गगनाला पोहचलेले असतानाही कंत्राटदार मात्र 2018 मधील दराच्या तुलनेत तब्बल 13 ते 29 टक्के कमी दराने काम करण्यास कसे काय तयार होतात, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
यामुळेच नालेसफाई कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जातंय. पालिकेने यंदा मिठी नदीसह प्रत्येक परीक्षेत्रानुसार नाले सफाई करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. यात,फक्त शहर विभागातील एफ उत्तर,जी दक्षिण आणि जी उत्तर या प्रभागांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा तीन टक्के जादा दराने कंत्राट देण्यात येणार आहेत. तर, इतर ठिकाणी पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा कमी दराने कंत्राट देण्यात येणार आहे.
मिठी नदीची सफाई दोन टप्प्यात होणार असून याकरता पालिका 62 कोटी 42 लाख रुपये खर्च करणाराय. हे कामही 20 टक्के कमी दराने होणाराय. यात कुर्ला टिचर्स कॉलनी ते वांद्रे कुर्ला संकुला पर्यंतच्या नालेसफाईसाठी 32 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.तर,पवई फिल्टरपाडा ते टिचर्स कॉलनी पर्यंतच्या मिठी नदीच्या सफाईसाठी 29 कोटी 91 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
स्थायी समितीत हे कामाचे प्रस्ताव येण्यापूर्वीच यावरून काँग्रेसनं शिवसेनेला लक्ष्य केलंय. तर शिवसेनेनं विरोधकांना टिका, आरोप करण्याशिवाय दुसरं काही काम नसल्याचं म्हटले आहे.
प्रभाग अंदाजित दरापेक्षा कमी जास्त (टक्के) कंत्राटाची किंमत
एफ उत्तर , जी दक्षिण,जी उत्तर- अधिक 3 12,69,46,296
एल,एम पूर्व , एम पश्चिम उणे 13 13,83,11,376
एन,एस,टी उणे 9 9,91,14,419
एच पूर्व एच पश्चिम के पूर्व उणे 20.24 10,29,67,033
के पश्चिम,पी दक्षिण पी उत्तर उणे 29.80 10,76,64,445
आर दक्षिण , आर मध्य , आर उत्तर उणे 27.63