Uddhav Thackeray: शिवसेनेतील अंतर्गत वादानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडावं आहे. उद्धव ठाकरे यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मात्र, मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांत वाद निर्माण झाला आणि युती तुटली. अखेर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. या काळात तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या. शेतकऱ्यांना अपुरी मदत, कोरोना संकट, पालघर येथे साधूंची हत्या प्रकरण, सुशांतसिंह प्रकरण, कंगना राणौत प्रकरण, मराठा आरक्षणावरुन भाजपने महाविकास आघाडीवर अनेक आरोप-प्रत्यारोप केल्याचं पहायला मिळालं. शिवसेना कार्याध्यक्ष ते पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा प्रवास राहिला आहे. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेक चढउतार पाहिले. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    1997 च्या महापालिका निवडणुकीपासून उद्धव ठाकरे यांनी राजकारणात उघडपणे सहभाग घेण्यास सुरुवात केली.

  • 2003 साली शिवसेनेच्या महाबळेश्वर येथील अधिवेशनात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ पडली.

  • 2004 च्या निवडणुकीत पक्षाची सर्व सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. त्यामुळे नारायण राणेंची घुसमट वाढत चालली होती. अखेर 2005 मध्ये राणे यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • 2006 साली शिवसेना नेते आणि भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

  • 2012 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर पक्षाची सूत्र उद्धव ठाकरे यांच्या हाती देण्यात आली. 

  • 2013 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचं पक्षप्रमुख पद

  • 2014 विधानसभा निवडणुकीत राज्यात मोदी लाट असतानाही शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले होते.

  • 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्रीपदी पोहोचलेले ते शिवसेनेचे तिसरे मुख्यमंत्री आहेत आणि ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती आहे.

  • 32 महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात अनेकदा ठाकरे सरकार नावाने ओळखलं जाणारं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला.


मुख्यमंत्रिपदाच्या काळात घेतलेले निर्णय


  • उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी 32 महिने होते. या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्य बुलेट ट्रेनला ब्रेक लावला. राज्यात रोजगार निर्मितीसाठी हा प्रकल्प फायदेशीर आहे का? यावर चर्चा करुनच या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेच्या जंगलातील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

  • नागपूर ते मुंबई प्रवास जलदगतीने व्हावा, यासाठी समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकाने घेतला होता. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाणार आहे. 

  • 2015 मध्ये मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती Axis बॅंकमध्ये उघडण्यावरून मोठा गदारोळ झाला होता. मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती Axis बॅंकेतून HDFC बॅंकेत वळवण्याचा निर्णय घेतला. 

  • जनतेतून सरपंच निवड करण्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय रद्दबातल केला.

  • जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

  • कोरोना काळात शिवभोजन थाळी अवघ्या 5 रुपयांत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय


मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने नवी मुंबई विमानतळाच्या दि.बा. पाटीलांच्या नावाला मंजुरी, औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव यासारखे महत्त्वाचे निर्णय घेतले.