India Politics : 2024 लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) आता फक्त सव्वा वर्ष राहिलंय, सर्वच पक्षांनी कंबर कसलीय. भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री कामाला लागलेत. मोदींविरोधात विरोधकांच्याही बैठका सुरु आहेत मात्र अजूनही ठोस रणनीती ठरलेली नाही. अशात लोकसभा निवडणुकीत मोदींना रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (SSUBT) नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कडे सोपवण्यात येणारअसल्याचं समजतंय. शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbole) आणि शिवसेना हे नाव गोठवलं गेल्यानंतर उद्धव ठाकरे घायाळ झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेतल्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) टक्कर देण्यासाठी एक संघटित आघाडी उभी करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केलाय. उद्धव ठाकरे स्वत: विरोधी पक्षांसोबत बोलणी करतायत. विरोधकांना (Opposition) एकत्र आणण्यासाठी मुख्य भूमिका बजावत आहेत. विशेष करुन प्रादेशिक विरोधी पक्षांची मोट बांधण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर सोपवल्याचा दावा करण्यात येतोय. 


ठाकरेंसाठी मेगाप्लॅन काय?








2024 लोकसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वत: विरोधी पक्षांसोबत बोलणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  खासकरुन प्रादेशिक विरोधी पक्षांची मोट बांधण्याची  जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवल्याचा दावाही करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालाय. अलीकडच्या काळात देशातील सर्व विरोधी एकत्र येत आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यात ते नक्कीच यशस्वी ठरतील असा विश्वास अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी व्यक्त केला आहे.


महाविकास आघाडी सरकारचं (Mahavikas Aghadi) नेतृत्व करताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी प्रभावी कामगिरी केली होती. ठाकरे हे आता पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत, ठाकरेंकडून कोणताही धोका नाही अशी खात्री आता विरोधकांना पटलीय. त्यामुळेच विरोधकांची मशाल ठाकरेंच्या हाती सोपवण्यात आलीय. आता ठाकरे ही जबाबदारी कशी पार पाडतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.