मुंबई  : देशात कोरोना लसीकरण जोमात सुरू असताना चांगली बातमी समोर आली आहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असली तरी, लसीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारताच्या लसीकरण मोहीमेत सीरम इंन्स्टीट्युटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनचा सामावेश आहे. या दोन्ही लशी भारतीय कोरोना व्हेरियंटवर प्रभावी आहेत. लसीकरणानंतर संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणं दिसून येतात. एकीकृत जैवविज्ञान संस्थेने याविषयीच्या अभ्यासाच्या प्राथमिक निष्कर्षावर हा अहवाल दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संस्थचे संचालक अनुराग अग्रवाल म्हणतात की, 'लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यामुळे रुग्णाच्या जीवाल्या सहसहा धोका पोहचत नाही. संसर्गाची लक्षणं सौम्य राहतात'


भारतात सध्या डबल म्युटंट विषाणूचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे बोललं जात आहे. भारतीय लसीकरणात महत्वाची भूमीका बजावणाऱ्या दोन्ही लशी या विषाणूवर प्रभावी आहेत.



---------------------------


कोरोना लसीकरणानंतर न्यूट्रिलायझिंग अँटिबॉडीज तयार झाल्याचे समोर
कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली तर मृत्युचेही प्रमाण वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. आता  लसीकरणानंतर दोन प्रकारच्या अँटिबॉडीज (Corona antibodies) तयार होतात, हे अभ्यासात पुढे आले आहे.  बायडिंग अँटिबॉडीज आणि न्यूट्रीलायझिंग अँटिबॉडीज. बायडिंग अँटिबॉडीज नसलेल्यांमध्येही न्यूट्रीलाईझिंग अँटिबॉडीज असतात. लसीकरणानंतर न्यूट्रीलाईज अँटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. 20 टक्के ते 98 टक्क्यांपर्यंत अँडिबॉडीज मिळाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी ही महत्वाची बाब आहे.