राज्यात मिनी-लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांकडून आज घोषणेची शक्यता
राज्यात आज कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचं संकट वाढत असताना आता राज्यात मिनी-लॉकडाऊनची शक्यता आहे. याचा अर्थ राज्यात पूर्ण लॉकडाऊन होणार नाही. पण कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्यात कोरोना रुग्णांचा दररोज होणारी वाढ आता ४० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचं हे वाढत संकट पाहता मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आज या मिनिलॉकडाऊची घोषणा होऊ शकते. राज्यात कोणते कोणते निर्बंध लागू होतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. राज्यात संचारबंदीची वेळ वाढण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणांवर पूर्णपणे बंदी येण्याची शक्यता आहे.
राज्यात लॉकडाऊनबाबत मतभेद आहेत. काही लोकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. पण काही लोकांकडून लॉकडाऊनची मागणी होत आहे. सरकार देखील लॉकडाऊनच्या बाजुने नाही. त्यामुळे राज्यात मिनी-लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते.
मॉल, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, मंदिरं, मैदानं, गार्डन्स आणि पिकनिक पॉईंट्सवर पूर्णपणे बंदी येण्याची शक्यता आहे. दुकाने देखील पी१-पी२ प्रमाणे सुरु ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. खाजगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम' देण्यासाठी सूचना दिल्या जावू शकतात. सरकारी आणि निम-सरकारी कार्यालयांमध्ये कमी संख्येने कर्मचाऱ्यांना बोलवलं जावू शकतं. लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी दिली जावू शकते.
पुण्यात देखील मिनी-लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. पुढील ७ दिवस हे निर्बंध लागू असणार आहेत.