मुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती आता हळूहळू हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाला देखील याबाबत गांभीर्य लक्षात आल्याने आज मुंबईत आणखी कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत अनेकांना कोरोनाची लक्षणं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असल्यांचं निरीक्षण देखील नोंदवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील लोकलमध्ये वाढलेली गर्दी आता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. लोकलमधून मोठ्या प्रमाणाता कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. हेच गांभीर्य लक्षात घेऊन आता मुंबईतील लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. पुण्यात उद्यापासून ७ दिवस कडक निर्बंध लागू झाले आहेत. त्यातच आता मुंबईत देखील कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील याबाबत संकेत दिले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. मुंबईतील मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणे बंद केली जाण्यची शक्यता आहे. दुकाने आणि बाजरपेठांसाठी देखील नवीन नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. 


मुंबईतील लोकलमध्ये सर्वांना परवानगी दिली गेली होती. पण आता केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. 


राज्यात कोरोनाची परिस्थिती पुन्हा एकदा मार्चसारखीच होत आह. दररोज रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे गर्दी होणाऱ्या ठिकाणी प्रशासनाला निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे.


आज संध्याकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्र्यांची सचिव आणि अधिकार्‍यांबरोबर बैठक होत आहे. बैठक झाल्यानंतर रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू करण्याची मुख्यमंत्री आज रात्री घोषणा करतील अशी शक्यता आहे.